आखिर भारत भालके यांचा मोबाईल चालू होणार होय मी भगीरथ दादा भालके बोलतोय






आखिर भारत भालके यांचा मोबाईल चालू होणार होय मी भगीरथ दादा भालके
बोलतोय






पंढरपूरचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे
मतदारसंघावर पकड असणारा सर्वसामान्य लोकांच्या मनात घर निर्माण केलेल्या नेत्याची उणीव सर्वसामान्य लोकांना जाणवत आहे. मात्र आमदार भारत भालके यांचा जनसंपर्काचा मोबाईल नंबर भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भालके यांनी परत एकदा जनसंपर्कासाठी सुरु केला आहे. नेहमीच्या पद्धतीने या क्रमांकावर लोकांनी आपल्या अडीअडचणी व कामा संदर्भात संपर्क साधावा असे आवाहन विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक भगीरथ भालके यांनी केले आहे
कोरोनाची बाधा झाल्यानंतर भारत भालके यांना पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र सहा दिवसात त्यांच्या प्रकृतीसाठी अवघ्या मतदारसंघातील देवी-देवतांना साकडे घालण्यात आले. अनेकांनी त्यांच्या चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली व त्यातून सहीसलामत बाहेर पडले. मात्र नंतर इतर आजाराने डोके वर काढले नंतर पुणे येथे उपचार घेत असताना भारत भालके यांचा जनसंपर्कात असणारा कायमचा नंबर त्या काळात बंद ठेवण्यात आला होता. भारत भालके यांचे अकाली निधन झाले आणि मतदारसंघावर पोरकेपणा जाणवू लागला होता. शोकसभा व सांत्वन भेटीदरम्यान अनेकांनी भारत भालके यांचा जनसेवेचा वसा भगीरथ भालके यांनी स्वीकारावा व मतदारसंघांमध्ये भारत भालके यांचे काम अखंडपणे सुरू ठेवावे यासाठी जनसंपर्कात असणारा तो नंबर लवकरात लवकर सुरू करावा असे आवाहन केले होते आमदार भारत भालके यांनी गेल्या दहा वर्षात मतदारसंघातील जनतेशी थेट संपर्क ठेवला होता. त्यांच्याकडे असणाऱ्या संपर्क क्रमांकातील एक संपर्क क्रमांक कायम लोकांना उपलब्ध असायचा. भारत भालके हे कामात व्यस्त असले तर मोबाईल नंबरवर आलेल्या मिस कॉलवर देखील संपर्क साधायचे. यामुळे मतदारसंघातील सर्व सामान्य लोकांना भालके अधिक जवळचे वाटत असायचे. हीच अपेक्षा अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले होती. या नुसार तो मोबाईल नंबर पुन्हा सुरू झाला असल्याने लोकांमध्ये व्यक्ती बदलला असला तरी विचार तोच आहे अशी भावना निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत असून मंगळवेढा येथे शहरात मध्यवर्ती चौकात असणारे भारत भालके यांचे कार्यालय शुक्रवारपासून सुरू करण्यात आले आहे अशी माहिती स्वीय सहाय्यक रावसाहेब फटे यांनी दिली असून तालुक्यातील लोकांच्या अडचणी या पूर्वीप्रमाणेच सोडवण्यासाठी हे कार्यालय नेहमीप्रमाणे जनसेवे मध्ये सुरू असणार आहे





