पंढरीतील कलाकारांना मनसेची दिवाळी भेट..
पंढरपूर- कोरोना आणि लाॅकडाऊन मुळे अडचणीत आलेल्या कलाकारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिलीप धोत्रे यांनी स्थानिक गरीब व गरजू कलाकारांनी साखर,गरा,रवा,तेल,दाळ,साबण,उटणे आदींसह जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.
मागील आठ महिन्यापासून लाॅकडाऊन आहे. या काळात स्थानिक कलाकारांची मोठी कुचंबणा झाली.
आर्थिक अडचणीत असलेल्या या कलाकारांची दिवाळी गोड व्हावी यासाठी आज येथील शंभरहून अधिक गरजू व गरीब कलाकारांना भेट देऊन दिवाळी गोड केली.
ऐन दिवाळी मदत मिळाल्याने मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांचे कलाकारांनी आभार ही मानले.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत. आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9657169368 हा आमचा नंबर.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!