दारू पिण्यास विरोध करणार्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून.मुलांना दिली वडिलाविरुद्ध तक्रार

दारू पिण्यास विरोध करणार्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून.मुलांना दिली वडिलाविरुद्ध तक्रार

पंढरपूर : दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी सतत बोलत असल्याने, पतीने तिचा कुऱ्हाडीने खून केल्याची घटना बुधवारी रोजी साडे तीन च्या आसपास पंढरपुरात घडली आहे. मयत महीलेचे नाव राधीका बाबा सावतराव (वय ४९, रा.जुना सोलापूर नाका झोपडपट्टी, हनुमान टेकडी गोशाळा,पंढरपूर, जि. सोलापूर) असे आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबा लक्ष्मण सावतराव हे सतत दारू पित असे. यामुळे राधीका बाबा सावतराव या बाबा सावतराव यांना दारू पित असल्याचे कारणावरून नेहमी बोलत होत्या. याचा राग मनात धरून त्यांनी घरातील लाकडे तोडण्याच्या कुऱ्हाडीने तिच्या डोक्यात घाव घालून तिला ठार मारले. याबाबत त्या दोघांचा मुलगा शिवम बाबा सावतराव (वय १९) याने ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पुढील तपास स.पो.नि. मगदुम करीत आहेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत. आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9657169368 हा आमचा नंबर.

44 thoughts on “दारू पिण्यास विरोध करणार्या पत्नीचा डोक्यात कुऱ्हाड घालून खून.मुलांना दिली वडिलाविरुद्ध तक्रार

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!