कोर्टी जवळ अपघातात 1 ठार : कारने बापलेकास ठोकरले

कोर्टी येथे मोटारसायकल ला कार ने पाठीमागून धडक दिली

कोर्टी ( ता.पंढरपूर ) येथील श्री नगरी वसहतीजवळ पंढरपूर कडे मोटारसायकल वरून निघालेल्या बाप लेकास चारचाकी वाहनाने पाठीमागून ठोकरले. या अपघातात मुलाचा मृत्यू झाला असून बाप गंभीर जखमी झाला आहे. सिद्धनाथ दत्तात्रय वाघमोडे ( रा. कोर्टी ) असे मयत युवकाचे नाव आहे.कोर्टी येथील सिद्धनाथ दत्तात्रय वाघमोडे हा युवक सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास आपल्या वडीलांसह पंढरपूर कडे निघाला होता. त्यावेळी श्री नगरी वसाहती जवळ आल्यानंतर या मोटार सायकल ( क्र. mh 13, cd 2311 ) ला पाठीमागून येणाऱ्या कार ( क्र. ap16, bg 5544) वाहनाने धडक दिली.यावेळी दोघेही बापलेक उडून पडले आणि जबर मार लागल्याने मुलगा सिद्धनाथ ( वय 22 वर्षे ) याचा मृत्यू झाला तर वडील दत्तात्रय हे गंभीर जखमी झालेत.

📲 राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत. आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9657169368 हा आमचा नंबर.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!