उद्योगपती अभिजित आबा पाटील पळशीकरांच्या मदतीला गेले धावून

उद्योगपती अभिजित आबा पाटील पळशीकरांच्या मदतीला गेले धावून

पंढरपूर तालुक्यातील पळशी येथे श्री.बाळू धोंडीबा लोखंडे रा.पळशी ता.पंढरपूर यांच्या नुकसानीची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे घराला घरपण देणारा संसार वाहून गेला. कासाळ गंगा ओढ्याला पूर आल्याने घरातील लोकोपयोगी सर्व वस्तू, शेतातील विहीर गाळाने भरली,यात सात जनावरे हि दगावली. दोन एकर उभे पिक डाळिंब व ऊस वाहून गेल्याने शेताततील तीन-चार फुट माती वाहून गेली आहे. काबाड कष्ट करून उभ्या केलेल्या संसारा वाहून गेला मन सुन्न झाले आपण फक्त बोलून धीर देऊन चालणार नाही, म्हणून फुल ना फुलाची पाकळी म्हणून आर्थिक मदत करून कुटुंबियांना धीर दिला.
ओढ्या लगत राहणाऱ्या सर्व नागरिकांचे मोठ्या प्रमाणातावर नुकसान झाले. झालेल्या नुकसाणीची पाहणी करून लवकरात लवकर पंचनामे करण्यात आल्याची माहिती मिळाली नुकसानीची शासनाकडून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यात पाठपुरावा करु असे आश्वासन दिले.
यावेळी पळशी गावचे धनंजयदादा बागल, उपसरपंच शिवाजी लोखंडे, पोलीस पाटील अशोक लोखंडे, सचिन पवार, योगेश जाधव उपस्थित होते.
-अभिजीत धनंजय पाटील.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!