मंगळसूत्र चोरणारे दोन चोरटे गजाआड; पंढरपूर तालुका पोलीसांची कारवाई

मंगळसूत्र चोरणारे दोन चोरटे गजाआड; पंढरपूर तालुका पोलीसांची कारवाई
पंढरपूर : प्रतिनिधी
पहाटे मॉर्निंग वॉकला जाणार्‍या महिलेला आडवून तिच्या गळ्यातील सोन्याचे गंठण व हातातील मोबाईल चोरू नेणार्‍या दोन जणांना पोलीसांनी सापळा रजून अटक केली आहे.
याबाबत हाकीकत अशी की, दि. 06 रोजी पहाटे 5:00 वा. दरम्यान अश्‍विनी बाळासाहेब काकडे  (वय 34 वर्ष) रा. शाहूनगर टाकळी रोड पंढरपूर हे मॉर्निंग वॉकला जात होत्या.  त्या अण्णाभाऊ साठे शाळेजवळ आले असता पाठीमागून मोटार सायकलवरून 02 अनोळखी इसम आले व त्यांनी मोटार सायकल आडवीलावून पाठीमागे बसलेल्या इसमाने अश्‍विनी यांच्या गळ्यातील 5 ग्रॅम वजनाचे मनीमंगणसुत्रास हिसका मारून हातातील विवो कंपनीचा मोबाईल हॅन्डसेट जबरदस्तीने हिसकावून 22,000 रू. किंमतीचे ऐवज जबरीने चोरून नेले. याबाबत अश्‍विनी काकडे यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात  फिर्याद दाखल केली. त्याप्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीसांना त्याचे गोपनीय बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, सदर गुन्ह्यातील परशुराम व्हनकळस व त्याचा साथिदार सुहास काळे यांनी त्यांचे जवळील पल्सरगाडीचा वापर करून केला असून ते दोघे पंढरपूर शहरातील गुरूकृपा हॉटेल समोर मोटार सायकलसह थांबले असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे पो.नि सावंत यांनी पंढरपूर येथे कार्यरत असलेले स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकास माहिती दिली. मिळालेल्या बातमी प्रमाणे पथकातील कर्मचारी यांनी पंढरपूर येथे जाऊन बातमीच्या ठिकाणी मिळुन आलेल्या 2 संशयित इसमांना ताब्यात घेवून त्यांना त्याचे नांव पत्ता विचारले असता त्यांनी त्याचे नाव परमेश्वर उर्फ परशु विठ्ठल व्हनकळस, (वय 25) वर्षे रा. पुळुज ता. पंढरपूर, सुहास उर्फ भैय्या मायप्पा काळे, (वय 20 वर्षे ) रा. बोहाळी ता. पंढरपूर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे गुन्हयाच्या अनुषंगाने विचारपूस केली असता. 04 महिन्यापूर्वी दोघांनी मिळून पल्सर गाडीचा वापर करून टाकळी रोड येथे पहाटेच्या सुमारास मॉर्निग वॉक करणार्‍या महिलेच्या गळयातील मनी मंगळसुत्र व हातातील मोबाईल हॅन्डसेट हिसका मारून चोरल्याचे कबूल केले आहे. त्याचेकडुन एक मनी मंगळसुत्र, विवो कंपनीचा मोबाईल व गुन्हयात वापरलेली मो. सा. असा एकूण 82 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.  सदर कामगिरी  पोलीस अधीक्षक मनोज पाटील, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री. अतुल झेंडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण सावंत यांचे नेतृत्वाखाली पोहेकॉ गोरक्षनाथ गांगुडे, मोहन मनसावाले, पो.ना. बापू शिंदे, लालसिंग राठोड, अजय वाघमारे, आसिफ शेख व चापोकॉ दिपक जाधव यांनी बजावली आहे.

70 thoughts on “मंगळसूत्र चोरणारे दोन चोरटे गजाआड; पंढरपूर तालुका पोलीसांची कारवाई

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!