मंदिर समिती पावती घोटाळा प्रकरणी आरोपी सिध्देश्‍वर घायाळ यास अटकपुर्व जामीन अर्ज मंजुर

मंदिर समिती पावती घोटाळा प्रकरणी आरोपी सिध्देश्‍वर घायाळ यास अटकपुर्व जामीन अर्ज मंजुर

दि. 9 जुलै 2019 रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर येथे कार्यातील इलेक्ट्रीक विभागातील वायरमन सिध्देश्‍वर विठ्ठल घायाळ याने भाविकाला मंदिर समितीची बाद झालेली पावती ही खरी आहे असे भासवुन भाविकाकडून 1100/- रु. रक्कम रोख स्वरुपात स्विकारुन भाविकाची फसवणुक केल्यासंबंधी घायाळ यांच्यावर मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे देणगी विभाग प्रमुख राजेश सात्ताप्पा पिटले यांनी पंढरपूर शहर पोलिस ठाणे येथे भा.दं.वि.कलम 420 प्रमाणे फिर्याद दाखल केली होती. 
 
 सदर संशयीत आरोपी सिद्धेश्वर विठ्ठल घायाळ यास पंढरपूर येथील मे.सत्र न्यायाधीश यांनी  अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. सदर आरोपीतर्फे अ‍ॅड. सिद्धेश्वर चव्हाण यांनी कोर्टासमोर सादर केलेल्या युक्तीवादास ग्राह्य धरुन मे.सत्र न्यायाधीश यांनी संशयीत आरोपी सिध्देश्‍वर विठ्ठल घायाळ यास अंतरिम अटकपुर्व जामीन मंजुर केला आहे.  आरोपीतर्फे अ‍ॅड. सिद्धेश्वर अर्जुन चव्हाण व अ‍ॅड. सौ.गायत्री सिद्धेश्वर चव्हाण (देगाव) यांनी कामकाज पाहिले.

130 thoughts on “मंदिर समिती पावती घोटाळा प्रकरणी आरोपी सिध्देश्‍वर घायाळ यास अटकपुर्व जामीन अर्ज मंजुर

Leave a Reply

Your email address will not be published.

ताज्या बातम्या

error: Content is protected !!