बेकिंग -पंढरपूर तालुक्यात आ.प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला ; आंदोलकांशी भिडल्या ! प्रणिती शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

बेकिंग न्यूज

पंढरपूर तालुक्यात आ.प्रणिती शिंदे यांच्या वाहनावर हल्ला ; आंदोलकांशी भिडल्या ! प्रणिती शिंदे यांचा भाजपवर गंभीर आरोप

मंगळवेढा प्रतिनिधी:सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघात गावभेटीवर असताना त्यांच्या मोटारीवर हल्ला झाला. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तरूणांच्या जमावाने केलेला हल्ला प्रत्यक्षात मराठा आरक्षण आंदोलनाच्या आडून भाजपनेच केल्याचा आरोप आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. आपल्यावर थेट हल्ल्याचा प्रयत्न झाला. परंतु बचावले. यात मोटारीचे नुकसान झाले. महिला आमदारावर हल्ला करणे निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या