सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन संपन्न..,

सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे मिल रोलर पुजन संपन्न..,
———————————-
भाळवणी (दि.01) :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2022-23 च्या 23 व्या गळीत हंगामाचे मिल रोलरचे पुजन चेअरमन कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते आणि संचालक मंडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
सुमारे 6.50 लाख ऊसाचे गाळप यंदाच्या हंगामत करण्यात येणार असून, त्याकरीता ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी, बजॅट व हार्वेस्टर मशिनचे करार करण्यात आले असून, पहिला ॲडव्हान्स हप्ता देण्यात आलेला आहे.  उद्ष्टि पुर्ततेसाठी हंगाम बंद कालावधीत मशिनरीचे देखभाल दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर असून, दैनंदिन गाळप क्ष्‍मता वाढविण्यासाठी आवश्यकते मशिनरीमध्येही बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे सन 2022-23 मध्ये 6.50 लाखापेक्षाही जास्त उच्चांकी गाळप करण्यात येणार आहे. ऊस तोडणी वाहतुक ठेकेदारांना मागील कमिशन डिपॉझिटसह आणि ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना उर्वरीत एफ.आर.पी. रक्क्म देण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी यावेळी सांगितले. सभासद ऊस पुरवठादार शेतकऱ्यांनी संस्थेबाबत सोशल मिडिया, मोबाईल व इतर माध्यमातुन पसरविण्यात येत असलेल्या जुन्या बातम्यावर विश्वास न ठेवता आपल्या संस्थेशी एकनिष्ठ् राहुन आपला संपुर्ण ऊस सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्यास देण्याचे आवाहन कल्याण काळे यांनी केले. 

यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक झुंजार आसबे यांनी कार्यक्रमास आलेल्या उपस्थित संचालकांचे स्वागत करुन कामगारांना 6.50 लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट पुर्ण करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

श्रीविठ्ठल सहकारी साखर साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये निवडून आल्याबद्दल दिनकर आदिनाथ चव्हाण यांचा तसेच पंढरपूर तालुका रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया चे कोषाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सचिन भोसले यांचा सत्कार कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांचे शुभहस्ते यावेळी करण्यात आला.

सदर प्रसंगी कारखान्याचे माजी व्हा.चेअरमन मारुती भोसले, संचालक मोहन नागटिळक, गोरख जाधव, भारत कोळेकर, आण्णा शिंदे, दिनकर कदम, दिनकर चव्हाण, विलास जगदाळे, सुधाकर कवडे, युवराज दगडे, इब्राहिम मुजावर, नागेश फाटे, यशवंतराव चव्हाण नागरी सहकारी पतसंस्थचे चेअरमन शहाजी साळुंखे, प्रतिभादेवी नागरी सह.पतसंस्थेचे चेअरमन विष्णु यलमार, माजी चेअरमन महादेव देठे, विठ्ठल साखर कारखान्याचे माजी संचालक उत्तम नाईकनवरे, माजी पंचायत समिती सदस्य चंद्रकांत पाटील, कार्यकारी संचालक झुंजार आसबे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

error: Content is protected !!